बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मार्च 2020 (17:34 IST)

कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह आली आहे. दरम्यान चाचणी पॉझिटीव्ह असली तरी तिच्या परिस्थीत सुधारणा होत असल्याचा खुलासा डॉक्टरांनी केला आहे. प्रत्येक  ४८ तासांनंतर कोरोना रुग्णाची चाचणी करण्यात येते.  सध्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये कनिकावर उपचार सुरू आहेत. संस्थेचे संचालक प्राध्यापक आर.के धिमान यांनी तिची परिस्थिती स्थिर असल्याचे सांगितले आहे. 
 
लंडनहून परतल्यानंतर कनिकाला अस्वस्थ वाटू लागलं. ज्यानंतर तिला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं गेलं. पण, अद्यापही तिचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्हच येत असल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्य केली आहे.