शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 23 मार्च 2020 (13:34 IST)

पाकिस्तानात लॉकडाउन करणे शक्य नाही: इम्रान खान

करोना व्हायरसला लढा देण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाउन जाहीर केलं आहे. अशात पाकिस्तानात देखील लॉकडाउन केलं जावं अशी मागणी होत असताना पंतप्रधान इम्रान खान यांनी अशी शक्यता नाकारली आहे. 
 
आमच्या देशात 25 टक्के जनता ही दारिद्रय रेषेखाली जगत असल्यामुळे देशातील एक तृतीयांश जनता दारिद्र्य रेषेखाली जगत असून रोजंदारीवर आपलं पोट भरत असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.
 
पूर्ण लॉकडाउन करणं म्हणजे लोकांना घरात राहण्यास भाग पाडणे. आमच्या देशातील 25 टक्के जनता ही दारिद्र्य रेषेखाली जगत असून रोजंदारीच्या कमाईवर आपलं पोट भरते. आमची स्थिती लक्षात घेता योग्य ती पाऊलं उचलत आहोत असं इम्रान खान यांनी कोणतीही भीती पसरवू नका असं आवाहन केलं आहे.
 
या संकटातून आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत अशी माहिती खान यांनी दिली आहे.
 
पाकिस्तानात करोनाची लागण झालेल्यांची संख्या 686 वर पोहोचली आहे.