शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 22 जून 2021 (07:45 IST)

राज्य सरकारने १८ ते पुढील वयोगटातील नागरिकांना कोरोना लस देणार

कोरोना लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरणाला स्थगिती दिली होती. परंतु आता मंगळवारपासून राज्य सरकारने १८ ते पुढील वयोगटातील नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसेच राज्यातील नागरिकांनी आपापल्या जिल्ह्यातील कोरोना लसीकरण केंद्रावर जाऊन कोरोना लसीचा डोस घ्यावा असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
 
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यात आतापर्यंत ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत होते. परंतु लसीकरणाला वेग द्यायचा आहे. त्यामुळे १८ वर्षावरील नागरिकांना कोरोना लसीकरणाला परवानगी देण्यात येत आहे. यामुळे महाराष्ट्रातील तरुणाईनं कोरोना लसीकरण केंद्रावर जाऊन कोरोना लस घ्यावी असे आवाहन राजेश टोपे यांनी केलं असून १८ वर्षांच्या पुढील युवक युवती पासून पुढील सर्व वयोगटातील लोकांना कोरोना लस घेण्याचे शक्य असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे.