गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 1 मार्च 2021 (21:36 IST)

कोरोनामुळे गणपतीपुळे आणि कुणकेश्वर देवस्थानची यात्रा रद्द

राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट वाढत असल्यामुळे  कोकणातील  रत्नागिरी येथील गणपतीपुळेमधील अंगारकी यात्रोत्सव आणि सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील कुणकेश्वर देवस्थानची यात्रा रद्द करण्यात आली आहे.
 
दरम्यान, मंगळवार 2 मार्च रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीपुळे येथील गणपती मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी सर्व भक्तजनांना 'श्री'च्या ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 2 मार्च रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांपासून ganpatipule.co.in या वेबसाईट वर व ganpatipule mandir  या मोबाईल app वर ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर देवस्थानची 11 ते 13 मार्च दरम्यान होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कुणकेश्वर देवस्थानच्या आगामी यात्रा नियोजनाबाबत मंदिराच्या विश्वस्तांसमवेत आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला.