गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2019
Written By
Last Modified: हॅम्पशायर , सोमवार, 24 जून 2019 (11:41 IST)

आज बांगलादेश-अफगाण लढत

बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघात आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सोमवार, 24 जून रोजी साखळी लढत होत आहे.
 
बांगलादेशपुढे नवख्या अफगाणिस्तानचे आव्हान असणार आहे. बांगलादेशचा संघ उपान्त्य फेरी गाठण्यासाठी नेटाने प्रयत्न करीत आहे तर अफगाणिस्तान संघाचा भारताविरुध्द पराभव झाल्यामुळे हा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. परंतु पहिलीच विश्वचषक स्पर्धा खेळत असल्याने अफगाणिस्तान पहिल्या विजयाच्या शोधात आहे.
 
बांगलादेशने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिेकेचा 21 धावांनी पराभव केला. दुसर्‍या सामन्यात न्यूझीलंडकडून 2 गडी राखून पराभव पत्करला. इंगलंडने बांगलादेशवर 106 धावांनी मात केली. 
 
बांगलादेश- श्रीलंका लढत पावसाने रद्द झाली. बांगलादेशने वेस्ट इंडीजवर 7 गडी राखून विजय मिळविला तर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा 48 धावानी पराभव केला. बांगलादेश 6 सामन्यातून 2 विजय, 3 पराभव, 1 अनिर्णीत, 5 गुणासह साखळी गुणवक्यात सहाव्या स्थानी आहे.
 
ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, भारत या सहा संघांनी अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. 
 
भारताला मात्र विजय मिळविण्यासाठी अफगाणिस्तानने शेवटर्पंतझुंजविले. त्यामुळे बांगलादेश संघाला अफगाणिस्तानविरुध्द विजय मिळविणे सोपे राहणार नाही.
 
प्रतिस्पर्धी संघ :
 
बांगलादेश : मशरफे मुर्तुजा (कर्णधार), तमिम इकबाल, लिटॉन दास, सौम्य सरकार, मुशफिकर रहीम (यष्टिरक्षक), हामुदुल्लाह, शाकीब अल हसन (उपकर्णधार), मोहम्मद मिथून, सब्बीर रहमान, मोसाडेक हुसेन, मोहम्मद सैफुद्दीन, मेहदी हसन मिराज, रूबेल हुसेन, मुस्ताफिझूर रहमान, अबू जायेद.
 
अफगाणिस्तान : गुलाबदिन नायब (कर्णधार), मोहम्द शहजाद (यष्टिरक्षक), नूर अली झद्रान, हजरतुल्लाह झाझाई, रहमत शाह, अशगर अफगाण, हशमतुल्लाह शाहिदी, नजीब उल्लाह झद्रान, समीउल्लाह शिनवरी, मोहम्मद नबी, राशीद खान, दौलत झद्रान, अफताब आलम, हमीद हसन, मुजीब उर रहान.
 
सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.