शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (12:04 IST)

Diwali 2021 Date दिवाली कधी आहे? जाणून घ्या लक्ष्मी पूजा शुभ मुहूर्त

पंचांगानुसार दिवाळी सण 4 नोव्हेंबर 2021, गुरुवार या दिवशी साजरा केला जाईल.  कार्तिक महिन्यात अमावास्येच्या दिवशी प्रदोष काळ असल्यावर दिवाळी (महालक्ष्मी पुजन) साजरा करण्याची पद्धत आहे. जर दोन दिवसा पर्यंत अमावस्या तिथी प्रदोष काळाचा स्पर्श न झाल्यास दुसऱ्या दिवशी दिवाळी साजरी करण्याचे विधान आहे.
 
दिवाळी 2021 शुभ मुहूर्त Diwali 2021 Shubh Muhurat
 
दिवाळी : नोव्हेंबर, 2021, गुरुवार
 
अमावस्या तिथी  प्रारंभ : नोव्हेंबर 04, 2021 रोजी सकाळी 06:03 वाजता
अमावस्या तिथी समाप्त: नोव्हेंबर 05, 2021 रोजी सकाळी 02:44 वाजता
 
लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त Lakshmi Puja 2021 Shubh Muhurat
संध्याकाळी 18:10:29 ते 20:06:20
कालावधी :1 तास 55 मिनिटे
प्रदोष काळ : 17:34:09 ते 20:10:27
वृषभ काळ :18:10:29 ते 20:06:20
 
दिवाळी महानिशिता काळ मुहूर्त
लक्ष्मी पुजा मुहूर्त : 23:38:51 ते 24:30:56
कालावधी :0 तास 52 मिनिटे
महानिशिता काळ :23:38:51 ते 24:30:56
सिंह काळ :24:42:02 ते 26:59:42
 
दिवाळी शुभ चौघडी मुहूर्त
सकाळ मुहूर्त (शुभ): 06:34:53 ते 07:57:17
सकाळ मुहूर्त (चल, लाभ, अमृत): 10:42:06 ते 14:49:20
सायंकाळ मुहूर्त (शुभ, अमृत, चल): 16:11:45 ते 20:49:31
रात्र मुहूर्त (लाभ): 24:04:53 ते 25:42:34
 
दिवाळीला लक्ष्मी प्राप्ती उपाय
दिवाळीला काही उपाय करुन लक्ष्मी देवीला प्रसन्न करता येतं. या दिवशी विधीपूर्वक शुभ मुहूर्तात पूजा आणि उपाय केल्याने लक्ष्मी आपल्या भक्तांवर प्रसन्न होते. याने धनासंबंधी समस्या नाहीशा होतात आणि जीवनता सुख-समृद्धी नांदते. दिवाळीवर लक्ष्मी प्राप्ती उपाय-
 
दिवाळीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तात लक्ष्मी देवीच्या मंदिरात जाऊन पूजा करावी. अत्तर, उदबत्ती, कमळाचं फुल, लाल-गुलाबी वस्त्र अर्पित करुन खीरीचं नैवेद्य दाखवावं.
लक्ष्मी पूजनात ऊस, कमळाचं फुलं, कमल गट्टा, नागकेसर, आवळा, खीर याचा वापर करावा.
दिवाळीच्या दिवशी तिजोरीत नागकेसर, कमळाला लाल वस्त्र बांधून ठेवावे. याने धनात वृद्धी होते.
दिवाळीला नवदंपतीला घरी बोलावून आदराने भोजन करवावं, मिठाई आणि लाल वस्त्र भेट द्यावे.