दिवाळीच्या दिवशी
- मधुसुदन शाह
दिवाळीच्या दिवशीदरापुढे सडाताईच्या रांगोळीने येणार्याची तर्हाएक पाय लांबवर दुसरा पायरीवरताईची, तिच्या मैत्रिणीची मदार रांगोळीवर छोटे छोटे ठिपके, छोटे छोटे बिंदूकधि रेघांनी जुळतात, ताईच्या मनांत रेंगाळतात-गालीच्याचा आकाररांगोळी साकार कुठे त्रिकोण कुठे चोकोन, कुठे सरळ तर कुठे वाकलेली-सगळे रांगांनी सजलेलेजादुचा गालीचा लागला हसायलाअन् ताईला काहीतरी पुसू लागला.