भाऊबीज विशेष लाडक्या भावासाठी बनवा मऊ, रसाळ असे केशर कलाकंद पाककृती
साहित्य-
कंडेन्स्ड मिल्क -एक कप
साखर - चवीनुसार
किसलेले पनीर - एक कप
वेलची पूड - अर्धा चमचा
दूध - अर्धा कप
पिस्ता
बदाम
केसर धागे
कृती-
सर्वात आधी कंडेन्स्ड मिल्क एका पॅनमध्ये घाला. नंतर, किसलेले पनीर दुधात घाला आणि मिक्स करा. आता मिश्रण सतत ढवळत रहा. साखर आणि वेलची पावडर घाला. आता, अर्धा कप गरम दूध घ्या आणि केशर धागे घाला. केशर आणि दुधाचे मिश्रण पॅनमध्ये घाला आणि ढवळत रहा. मिश्रण घट्ट होऊ द्या. ते पॅनमधून निघेपर्यंत ढवळत रहा. आता स्टीलच्या ट्रे किंवा प्लेटमध्ये तूप लावा, त्यात तयार केलेले मिश्रण घाला आणि ते समान रीतीने पसरवा. त्यावर बारीक चिरलेले पिस्ता आणि बदाम घाला. थंड झाल्यावर, चाकूने बर्फीच्या आकारात कापून घ्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik