बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By
Last Updated : मंगळवार, 1 मार्च 2022 (12:01 IST)

उपावासाचा बटाटा वडा Batata Vada

साहित्य-
अर्धा किलो उकडलेले बटाटे, 1 रताळे किसलेले, एक चमचा जीरं, एक चमचा आले पेस्ट, 4 हिरव्या मिरच्या, बारीक कापलेली कोथिंबीर, मीठ चवीप्रमाणे, एक चमचा लिंबाचा रस, 3 चमचे दाण्याचा कुट, 2 चमचे खवलेला ओला नारळ. कव्हरसाठी राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ आणि साबूदाणा पीठ (नसले तरी चालेल).
 
कृती -
बटाटे मॅश करुन घ्या. त्यात वाटलेल्या मिरच्या, आले व जिरं याची पेस्ट घाला. मीठ, लिंबाचं रस, दाण्याचा कुट, खोवलेला ओला नारळ घाला. सर्व मिश्रण एकजीव करा. गोळे करुन घ्या, चपटे वडे देखील करु शकता. आता सर्व पीठे एकत्र करुन त्यात पाणी घालून सरबरीत करा. त्यात थोडेसे मीठ, तिखट व किसलेला बटाटा किंवा रताळे घाला. कढईत तूप किंवा तेल गरम करा. एक चमचा गरम तेल मोहन म्हणून पिठात घालून मिसळून घ्या. वडे पिठात घोळवून तळून घ्या. गरमागरम वडे खोबर्‍याच्या चटणी सोबत सर्व्ह करा.