साहेब बीवी और गँगस्टर रिटर्न्स
साहेब बीवी और गँगस्टर रिटर्न्स खर्या अर्थाने सीक्वल आहे. अगोदरच्या साहेब बीवी और गँगस्टरचे कथानकाने विराम घेतला तेथूनच हा चित्रपट प्रवासास सुरूवात करतो. पडद्यावर चित्रपटातील नामावळी झळकल्याबरोबर दिग्दर्शक प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. पात्रांच्या सादरीकरणात तिग्मांशूचा चांगलाच हातखंडा आहे. लालच, ईर्ष्या, प्रेम, वासना, राजनीति, छळ, कपट, गुन्हेगारीस त्याने प्रत्येक क्षणास बदलणार्या पात्रांद्वारे सादर केले आहे.चित्रपटातील नाट्य सशक्त असून पात्रांच्या मनाचा थांगपता लावणे महत्कठिण आहे. प्रत्येकाचा आपला स्वार्थ असून त्याप्रमाणात त्यांचे विचार बदलरत राहतात.
पटकथेत कच्चे दुवेही आहेत. खासकरून मध्यांतरानंतर. काही दृश्य संभ्रमात टाकतात व चित्रपटाची लांबीही वाढवते. काही ट्रॅक अर्धवट वाटतात व चांगल्या संपादनाची आवश्यकता भासते. आयटम सॉंग करता पटकथेत बिल्कूल जागा नसतानाही ते ठेवण्यात आले आहे. मात्र चित्रपट बघताना या कमतरता डोके वर काढत नाही. चित्रपटातील अभिनय पक्ष सशक्त आहे. साहेबांच्या रूपात जिमी शेरगिलचा रूतबा पाहण्यालायक असून चित्रपटभर तो इतरांवर भारी पडतो. पतीचे प्रेम गमावलेली, व्यसनी, वाट चूकलेली कामूक महिला माहि गिलने दमदारपणे साकारून सशक्त अभिनेत्री असल्याचे परत सिद्ध केले.
इरफान खानची संवाद फेकीची विशिष्ट शैली असून या चित्रपटातही तो कमाल करतो. नेत्याच्या भूमिकेत राजीव गुप्ता छाप सोडतो. 'हम जी रहे है, कमबरा नही बने है', मर्द इसलिये ज्यादा गालियां बकते है क्योकी वे रोते कम है' यासारखे उत्कृष्ट संवाद चित्रपटात आहेत. योगेश जानींची सिनेमॅटोग्राफी चित्रपटास वेगळा लूक देऊन जाते. एकूणात हे एक उत्तम राजकीय व सामाजिक नाट्य आहे. बॅनर : ब्रांडस्मिथ मोशन पिक्चर्स, वायकॉम १८ मोशन पिक्चर्सनिर्माता : राहुल मित्रा, तिग्मांशु धुलियादिग्दर्शक : तिग्मांशु धुलियासंगीत : संदीप चौटाकलाकार : इरफान खान, जिमी शेरगिल, माही गिल, सोहा अली खान, राज बब्बर