शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. फ्रेंडशिप डे
Written By
Last Updated : शनिवार, 1 ऑगस्ट 2015 (13:01 IST)

बॉलीवूडचे पाच पक्के मित्र

आलिया भट्ट- श्रद्धा कपूर

दोन अभिनेत्रींची एकमेकींशी मैत्री कधीच होऊ शकत नाही, अशी सगळ्यांची समजूत आहे. ही तिला पाण्यात बघते आणि तिने हिचा बॉयफ्रेंड हिरवला असे किस्से अजूनही होत असतील तरी, बॉलीवूडमध्ये आलेल्या नव्या अभिनेत्रींनी मैत्रीचा नवा अध्याय आरंभ केला आहे. त्यात मुख्य नावं आहे आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूरचे.


 
श्रद्धाचे असे म्हटणणे आहे की आलिया आणि परिणिती दोघी माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. परीसोबत खूप मजा येतो पण आलियाबरोबर काही विशेष नातं आहे. ती खूपच स्वीट आणि ईझी गोइंग मुलगी आहे. कुठेही जायचं असलं की श्रद्धा आधी अलियाला मेसेज करून विचारते की ती चलत असेल तर बरोबर जाऊ या. आलियाही असंच करते. पार्टीजमध्येही दोघी एकमेकींना कंपनी देतो.

रणबीर कपूर- अयान मुखर्जी
 
अयान मुखर्जीने 2009 यावर्षी 'वेकअप सिड' सिनेमातून दिग्दर्शक म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली. या सिनेमात हीरो म्हणून रणबीर कपूर होता. तेव्हापासून या दोघांची घट्ट मैत्री झाली. रणबीर आपल्या मित्राबरोबर दुर्गा पूजेसाठी मंडपातही जातो. एवढंच नव्हे तर कित्येकदा रणबीर सुट्यांमध्ये आपल्या प्रेयसी कतरिनाबरोबर असताना अयानही तिथे हजर असतो.


अभिषेक बच्चन- गोल्डी बहल
 
अभिषेक बच्चन आणि गोल्डी बहल बालपणाचे मित्र आहे. ते दोघं एकाच शाळेत होते. गोल्डीने दिग्दर्शनाची सुरवातही अभिषेकसोबतच केली होती. त्याच्या 'बस इतना सा ख्वाब है' आणि 'द्रोण' या चित्रपटांमध्ये अभिषेक लीड रोलमध्ये होता. उल्लेखनीय आहे की अभिषेकचे वडील म्हणजेच अमिताभ बच्चन आणि गोल्डीचे वडील रमेश बहल हे दोघं ही चांगले मित्र होते.


दीपिका पदुकोण- शहाना गोस्वामी
 
दीपिका पदुकोण आणि शहाना गोस्वामीने आपल्या करियरची सुरुवात एकाच वेळी केली होती. ह्या दोघी एकमेकींबरोबर स्कुबा डायविंगचा मजा घेतात आणि बरोबर हँगआउट करतात. त्या आपसात सीक्रेट्सही शेअर करतात. सिनेमा "ब्रेक के बाद" मध्ये दोघींनी काम केले होते. दीपिका आणि शहाना ट्विटरवर एकमेकींची स्तुतीपण करतात.


करीना कपूर- अमृता अरोरा
 
करीना कपूर आणि अमृता अरोरा बेस्ट फ़्रेंड्स म्हणून ओळखल्या जातात. दोघी एकमेकींच्या पार्टीत आवर्जून उपस्थित असतात. अमृताच्या लग्नात तर करीना ब्राइडमेड म्हणजे करवली होती. त्या दोघी एकमेकींबरोबर हँगआउट करतात. दोघी एकमेकींची स्तुती करत असतात.