गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By
Last Modified: पाटणा , गुरूवार, 15 मे 2014 (16:44 IST)

'बिहारमधील नितीश कुमार सरकार पडणार- पासवान

16 व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर शुक्रवारी (16 मे) जाहीर होणार आहे. न‍िकाल जाहीर झाल्यानंतर बिहारमधील नितीश कुमार यांचे सरकार पडणार असल्याचे भाकीत लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीत लोकजनशक्ती पक्ष आणि भाजपने बिहारमध्ये एकत्र निवडणूक लढवली आहे. देशात मतदानाचे टप्पे संपताच बहुतांश वृत्तवाहिन्यांनी 'एक्झिट पोल'ने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सत्तेचे संकेत दिले आहे. या पार्श्वभूमीवर पासवान यांनी आपले मत व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीचा परिणाम बिहारमध्येही दिसून येणार आहे.

लोकसभेचे निवडणुकीच्या निकाल जाहीर होताच डझनभर आमदार नितीश कुमारांना सोडचिठ्ठी देणार आहेत. त्यामुळे नितीश कुमारांचे सरकारचा आधार गेल्याने ते आपोआप कोसळेल. बिहारमध्ये मुदतपूर्व निवडणुका घ्याव्या लागतील. येत्या नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील, असे मत पासवान यांनी व्यक्त केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजप आणि लोकजनशक्ती पक्ष एकत्र निवडणूक लढणार आहे. '