रविवार, 27 नोव्हेंबर 2022
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. देव-देवता
Written By वेबदुनिया|

दुर्गा

हिंदू धर्मात दुर्गा देवी ही प्रमुख देवींमध्ये एक आहे. शक्ती संप्रदायात सर्व देवींमध्ये दुर्गेला सर्वोच स्थान आहे व ती सर्वात शक्तीशाली देवी आहे. दैत्यांचा नाश करण्यासाठी देवांनी शंकराची पत्नी पार्वतीला प्रार्थना केली. तेव्हा पार्वतीने आदिशक्ती दुर्गेचा अवतार घेतला व असूरांचा नाश केला.

तिचा रूद्रावतार कालीमातेचा आहे. भारतात दुर्गादेवीची वेगवेगळ्या रूपात पुजा केली जाते. मध्य भारतात ती गौरी अवतारात आहे. तिचा हा अवतार एकदम शांत स्वरूपाचा व गोरा आहे. तिथे तिला गोड प्रसाद दाखवला जातो.

उत्तर भारतात काही भागात प्रसाद म्हणून पशू बळी दिले जातात. सिंह हे तिचे वाहन आहे. तिला दहा हात आहेत. हातात तिने त्रिशूळ, चक्र, तलवार, शंख, गदा, बाण, वज्र, कमळ धरले आहे.