शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गुजरातनो स्वाद
Written By
Last Modified: गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (13:20 IST)

खांडवी Khandvi recipe

सामुग्री
बेसन - 1/2 कप
दही-  1/2 कप
मीठ- 1/2  लहान चमचा किंवा चवीप्रमाणे
हळद- 1/4 लहान चमचा
आलं पेस्ट -1/2 लहान चमचा
तेल- 2 लहान चमचे
हिरवी कोथिंबीर- 1 टेबल स्पून (बारीक चिरलेली)
ताजं नारळं - 1-2 टेबल स्पून (किसलेलं)
तीळ -  1 लहान चमचा
मोहरी - 1/2 लहान चमचा
हिरवी मिरची - 1 
 
मिक्स जारमध्ये खांडवीसाठी पीठ तयार करा. त्यासाठी बेसन, दही, मीठ, आले पेस्ट, हळद आणि १ वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरमध्ये चालवून घ्या. 
 
पीठ तयार आहे, ते शिजवण्यासाठी, गॅसवर पॅन ठेवा आणि पॅनमध्ये पिठ घाला. मिश्रण चमच्याने ढवळत असताना ते चांगले घट्ट होईपर्यंत शिजवा. द्रावण सतत ढवळत राहा. 

सुमारे 4-5 मिनिटांत हे द्रावण पुरेसे घट्ट होईल.
 
द्रावण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. आता एक प्लेट घ्या, ते वरच्या बाजूला ठेवा आणि खांडवीचे द्रावण प्लेटमध्ये पातळ पसरवा, उचटणे वापरुन पीठ खूप पातळ पसरवा. 
 
सर्व पीठ त्याच प्रकारे प्लेट्समध्ये पातळ पसरवा आणि त्यांना थंड होऊ द्या.
 
मिश्रण थंड होऊन गोठल्यावर थर चाकूच्या साहाय्याने लांब पट्ट्यामध्ये कापून घ्या आणि या पट्ट्यांचा रोल बनवा, सर्व रोल प्लेटमध्ये ठेवा.
 
आता एका छोट्या कढईत तेल टाका आणि गरम करा, गरम तेलात मोहरी टाका, मोहरी नंतर त्यात तीळ घाला आणि गॅस बंद करा, आता बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला आणि मिक्स करा. आता हे तेल खांडवीवर ओतावे, खांडवीवर किसलेले खोबरे आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून सजवा. 
 
चविष्ट खांडवी तयार आहे. खांडवीला हिरव्या कोथिंबीरीच्या चटणीसोबत सर्व्ह करा आणि खा.
 
सूचना
जर तुम्ही मिक्सरच्या जारच्या मदतीने पीठ बनवत नसाल आणि हे द्रावण हाताने तयार करत असाल तर लक्षात ठेवा की द्रावणात गुठळ्या नसाव्यात आणि खूप गुळगुळीत पीठ असावं. सतत ढवळत असताना पीठ शिजवून घ्या आणि घट्ट झाल्यावर लगेच प्लेटमध्ये पसरवा.