शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By

गुरू पौर्णिमेला दूर करा करिअरचे अडथळे

गुरु पौर्णिमेचा पर्व अध्यात्म, संत-महागुरू आणि शिक्षकांसाठी समर्पित उत्सव आहे. हा पर्व पारंपरिक रूपात गुरु प्रती, संतांचे सानिध्य प्राप्त करण्यासाठी, उच्च शिक्षा ग्रहण करण्यासाठी व संस्कार प्राप्तीसाठी, शिक्षकांना सन्मान देऊन त्यांच्या प्रती आभार व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.
* सकाळी घराची स्वच्छता, स्नान, नित्य कर्माहून निवृत्त होऊन स्वच्छ वस्त्र धारण करून तयार व्हावे.
* घरातील पवित्र स्थानावर पाटावर पांढर्‍या रंगाचा वस्त्र घालून त्यावर 12-12 रेखा बनवून व्यास-पीठ बनवायला हवे.
* नंतर 'गुरुपरंपरासिद्धयर्थं व्यासपूजां करिष्ये' मंत्राने पूजेचा संकल्प घेयला हवा.
* त्यानंतर दाही दिशांमध्ये अक्षता सोडायला हवी.
* मग व्यास, ब्रह्मा, शुकदेव आणि शंकराचार्य यांचे नाव, मंत्राने पूजेचा आवाहन करायला हवे.
* आता आपल्या गुरू किंवा त्यांच्या फोटोची विधिपूर्वक पूजा करून त्यांना योग्य दक्षिणा अर्पित केली पाहिजे.
* या प्रकारे गुरु पूजन केल्याने जीवनात येणारे अडथळे आणि विशेषतः करिअरमध्ये येणार्‍या बाधा दूर होतात. गुरुंच्या आशीर्वादाला सर्वात पवित्र आणि शीघ्र फल देणारे मानले आहे.