शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 11 नोव्हेंबर 2024 (15:54 IST)

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Bhishma Panchak Vrat 2024 : आज, सोमवार, 11 नोव्हेंबर 2024 पासून भीष्म पंचक सुरू झाले आहे. मान्यतेनुसार भीष्म पंचक व्रत दरवर्षी प्रबोधिनी एकादशीपासून सुरू होते, जे कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालते. परंतु यावर्षी भीष्म पंचक व्रत सोमवार, 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत चालणार आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा या व्रताला 'भीष्म पंचक व्रत' म्हणतात आणि हे व्रत पाळणाऱ्याला सर्व प्रकारचे शुभ फल प्राप्त होतात.
 
भीष्म पंचक व्रताची उपासना पद्धत जाणून घ्या:
• भीष्म पंचक व्रताच्या दिवशी दैनिक कार्यांपासून निवृत्त होऊन स्नानादि करुन स्वच्छ वस्त्र धारण करावे.
• शुद्ध होऊन धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्राप्तीच्या निमित्ताने व्रत संकल्प करावे.
• पूजा स्थळी शेणाने पोतून त्यावर सर्वतोभद्र वेदी तयार करुन कलश स्थापित करावे.
• 'ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप करत भगवान श्री कृष्णाचे पूजन करावे.
• मंत्र- 'ॐ विष्णवे नमः' उच्चार करत स्वाहा मंत्राने तूप, तीळ आणि जवाचा 108 नैवेद्य दाखवून हवन करावे.
• पूजेच्या वेळी शुद्ध देशी तूप घेऊन लांब वातीने मोठा दिवा लावावा म्हणजे हा दिवा तुटणार नाही आणि 5 दिवस सतत तेवत राहील.
• या पाच दिवसीय भीष्म पंचक व्रतामध्ये 5 दिवस सतत दिवा तेवत ठेवावा, म्हणून याची पूर्ण काळजी घ्या आणि वेळोवेळी त्यात तूप टाकत राहा.
 
पौराणिक मान्यतेनुसार भीष्म पंचक व्रताचे महत्त्व जाणून घ्या: धार्मिक शास्त्रानुसार महाभारतातील सर्वात महत्त्वाचे पात्र भीष्म पितामह होते आणि पांडवपुत्र युधिष्ठिर यांच्या सांगण्यावरून त्यांनी देव प्रबोधिनी किंवा देवोत्थान एकादशीपासून 5 दिवस उपवास केला. पाचव्या दिवशी म्हणजे कार्तिक पौर्णिमेला राजधर्म, वर्णधर्म, मोक्षधर्म इतर विषयांवर उपदेश केला. 
 
त्यामुळे या स्मरणार्थ भगवान श्रीकृष्णांनी प्रसन्न होऊन भीष्म पितामहांच्या नावाने भीष्म पंचक व्रत स्थापन केले. म्हणून त्याला भीष्म पंचक म्हणतात. या व्रताबद्दल प्रचलित समजुतीनुसार, कार्तिक स्नान करणारी स्त्री किंवा पुरुष कोणतेही अन्न न घेता पूर्ण विधीपूर्वक हे व्रत पाळतात. सनातन धर्मात पंचकातील 5 दिवस अत्यंत अशुभ मानले गेले असले तरी कार्तिक महिन्यात येणारे भीष्म पंचक हे शास्त्रात अतिशय शुभ मानले गेले आहे.
 
असे मानले जाते की जे लोक या काळात हे व्रत करतात त्यांना आयुष्यभर अनेक प्रकारचे सुख उपभोगून मोक्ष प्राप्त होतो. हे व्रत करणाऱ्यांना धनधान्य, पुत्र, नातवंडे इत्यादी सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते.