शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

अक्षय तृतीयेला वैभव आणि धन संपदा मिळवण्यासाठी श्री महालक्ष्मी स्तोत्रमचा जप करावा

तसं तर आम्हा सर्वांना माहीत आहे की सर्व हिंदूंच्या जीवनात अक्षय तृतीयेचे महत्त्वपूर्ण स्‍थान आहे. हा विशेष दिवस वैशाख  शुक्ल तृतीयेला साजरा करण्यात येतो. असे मानले जाते की या दिवशी ग्रह आणि नक्षत्र या स्थितीत असतात की दिवसाची सुरुवात तर चांगली होतेच आणि अंत देखील उत्तम असतो. या दिवशी सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते आणि लग्नाचा मुहूर्त देखील या दिवशी फार खास असतो. या दिवशी तुम्ही कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करू शकता.  
  
अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेष करून महालक्ष्मीची पूजा केली जाते आणि तिच्याकडून धन धान्यात वाढ होईल अशी प्रार्थना केली जाते. असे मानले जाते की जर या दिवशी महालक्ष्मीच्या पूजेत स्‍तोत्रमचा पाठ पठणं केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.  
 
या बद्दल एक अशी किंवदंती आहे की कुबेराजवळ आधी काहीच नव्हत तर त्याने याच मंत्राने महालक्ष्मीची आराधना, अक्षय तृतीयेच्या दिवशी केली. यामुळे महालक्ष्मीने प्रसन्न होऊन त्यांना स्वर्गाचा खजिना सोपवून दिला. बर्‍याच लोकांना या मंत्राबद्दल माहिती नही आहे. तर आम्ही तुम्हाला सांगत आहे या मंत्रांबद्दल.....  
श्री महालक्ष्मी स्तोत्रम! 1. 
ॐ नमस्ते स्तु महामाये 
श्रीपीठे सुरपूजिते। 
शंख चक्र गदाहस्ते 
महालक्ष्मी नमो स्तुते ॥१॥ 
 
2. नमस्ते गरुडारूढे 
कोलासुरभयंकरि। 
सर्वपापहरे देवि 
महालक्ष्मी नमो स्तुते ॥२॥ 
 
3. सर्वज्ञे सर्ववरदे 
सर्वदुष्टभयंकरि। 
सर्वदुःखहरे देवि 
महालक्ष्मी नमो स्तुते ॥३॥  
 
4. सिद्धिबुद्धिप्रदे देवि 
भुक्तिमुक्तिप्रदायिनि। 
मन्त्रमूर्ते सदा देवि 
महालक्ष्मी नमो स्तुते ॥४॥  
 
5. आद्यन्तरहिते देवि 
आद्यशक्तिमहेश्वरि। 
योगजेयोगसम्भूते 
महालक्ष्मी नमो स्तुते ॥५॥  
 
6.. स्थूलसूक्ष्ममहारौद्रे 
महाशक्ति महोदरे। 
महापापहरे देवि 
महालक्ष्मी नमो स्तुते ॥६॥  
 
7. पद्मासनस्थिते देवि 
परब्रह्मस्वरूपिणि। 
परमेशि जगन्माता 
महालक्ष्मी नमो स्तुते ॥७॥  
 
8. श्वेताम्बरधरे देवि 
नानालङ्कारभूषिते। 
जगत्स्थिते 
जगन्मातर्महालक्ष्मी नमो स्तुते ॥८॥ 
 
9. महालक्ष्म्यष्टक स्तोत्रं यः 
पठेद्भक्तिमान्नरः। 
सर्वसिद्धिमवाप्नोति 
राज्यं प्राप्नोतिसर्वदा ॥  
 
10. त्रिकालं यःपठेन्नित्यं 
महाशत्रुविनाशनम्। 
महालक्ष्मीर्भवेन्नित्यंप्रसन्न 
वरदा शुभा ॥