शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 मे 2022 (14:55 IST)

श्री नृसिंह जयंती : नारायण नारायणाचा जप प्रल्हाद करीत असें

नारायण नारायणाचा जप प्रल्हाद करीत असें ,  ,
क्रोधीत हिरण्यकश्यपू , प्रल्हादावर होतसें !
नरहरी रूप प्रकट झाले, स्तंभा तुन,
भक्त प्रल्हादास घेतलं जवळ ममतेनं,
रूप होतें प्रचंड आक्राळ विक्राळ,
नरदेहास सिंहा चे मुख, मोठ्ठी आयाळ,
देण्यास पापाचे शासन, म्हणून धरिलें रूप,
दिल्यात यातना, राक्षसाने देवादिकास खूप,
सुटका करण्यास आले धावून श्री, नारायण,
मिळाले होतें अनेक वर, तरिही मात केली पण!
अशक्य होते हिरण्यकश्यपू स शासन करणे,
रूप श्री, नृसिंहा चे घेतले त्याच कारणे!
महिमा तुझा परमेश्वरा, भक्तांना देई दिलासा,
जेव्हा जेव्हा पाप वाढेल धरतीवर,
प्रकट व्हाल, विश्वास असा!
...अश्विनी थत्ते