ganesh chaturthi
✕

संत निवृत्तीनाथांचे अभंग 141 ते 150

Updated: बुधवार, 15 जून 2022 (15:27 IST)
 
आगम निगमा बोलतां वैखरी । तो यशोदेच्या करीं धरूनी चाले ॥ १ ॥
न संपडे शिवा बैंसताची ध्यानीं । जालिया उन्मनी दृश्य नव्हे ॥ २ ॥
कमळासनीं ब्रह्मा ध्यानस्थ बैसला । पाहतां पाहतां मुळा न संपडे ॥ ३ ॥
निवृत्ति गयनी सांगतुसे खुणा । तो देवकीचा तान्हा बाळ झाला ॥ ४ ॥
 
अष्टांग सांधनें साधिती पवन । ज्यासि योगीजन शिणताती ॥ १ ॥
तो हा कृष्ण गोपीगोपाळांमाझारी । क्रीडा नानापरी करी आत्मा ॥ २ ॥
अठरा साहिजणें बोलती परवडी । तो माखणासि जोडी स्वयें कर ॥ ३ ॥
निवृत्तीचें ध्येय कृष्ण हाचि होय । गयनिनाथें सोय दाखविली ॥ ४ ॥
 
अंधारिये रातीं उगवे हा गभस्ति । मालवे ना दीप्ति गुरुकृपा ॥ १ ॥
तो हा कृष्ण हरि गोकुळामाझारी । हाचि चराचरीं प्रकाशला ॥ २ ॥
आदि मध्य अंत तिन्ही जाली शून्य । तो कृष्णनिधान गोपवेषे ॥ ३ ॥
निवृत्तिनिकट कृष्णनामपाठ । आवडी वैकुंठ वसिन्नले ॥ ४ ॥
 
दुभिले द्विजकुळी आलें पैं गोकुळी । नंद यशोदे जवळी बाळकृष्ण ॥ १ ॥
खेळे लाडेकोडें गौळणी चहूंकडे । नंदाचें केवढे भाग्य जाणा ॥ २ ॥
ज्या रूपें वेधलें ब्रह्मांड निर्मळे । तेंचि हें आकारले कृष्णरूपें ॥ ३ ॥
निवृत्ति दिवटा कृष्णाचिया वाटा । नामेचि वैकुंठा पावन होती ॥ ४ ॥
 
विश्वीं विश्वपती असे पैं लक्ष्मीनाथ । आपणचि समर्थ सर्वांरूपी ॥ १ ॥
तें रूप गोकुळीं नंदाचिये कुळीं । यशोदे जवळी बाळकृष्ण ॥ २ ॥
सर्वघटी नांदे एकरूपसत्ता । आपणचि तत्त्वतां सर्वांरूपी ॥ ३ ॥
निवृत्तीचें पार कृष्णचि पै सार । गोकुळीं अवतार नंदाघरीं ॥ ४ ॥
 
जेथें नाहीं वेदु नाहीं पै शाखा । द्वैताचा हा लेखा हरपला ॥ १ ॥
तें रूप वोळलें नंदायशोदे सार । वसुदेवबिढार भाग्ययोगें ॥ २ ॥
नमाये पुरत ब्रह्मांडाउभवणी । त्यालागीं गौळणी खेळविती ॥ ३ ॥
निवृत्ति ब्रह्मसार सेवितुसे सोपें । नामें पुण्यपापें हरपती ॥ ४ ॥

सर्व पहा

Sarv Pitru Amavasya 2026 सर्व पितृ अमावस्येला महादेवाला या ५ वस्तू अर्पित करा

कमी तेलात बनवा कुरकुरीत उपवासाचे कटलेट; नवरात्रीत संध्याकाळच्या भुकेसाठी उत्तम पर्याय

श्राद्ध पक्षातील त्रयोदशीला श्राद्धाचे महत्त्व; श्राद्ध कसे आणि कोणासाठी केले जाते ते जाणून घ्या

नवरात्रीत वज्रेश्वरी देवीच्या दर्शनाला जात असाल, तर मंदिराचा इतिहास आणि जवळची प्रेक्षणीय स्थळे जाणून घ्या

शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले अर्पण करावीत आणि कोणते नैवेद्य दाखवावेत?

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments