शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 13 जून 2022 (15:52 IST)

संत निवृत्तीनाथांचे अभंग 91 ते 100

nivruttinath maharaj
न साहे दुजेपण आपण आत्मखुण । श्रुतीही संपूर्ण हारपती ॥१॥
वेदरूप श्रीकृष्ण योगिया जीवन । तें रूप परिपूर्ण आत्माराम ॥२॥
न दिसे वैकुंठीं योगियां ध्यानबीज । तो गोपाळांचें काज हरि करी ॥३॥
निवृत्ति गयनी हरि उच्चारित । माजि करि मनोरथ पुरी कामसिद्धि ॥४॥
 
नाहीं हा आकार नाहीं हा विकार । चतुर्भुज कर हरि माझा ॥१॥
हरिरूप पै जप हरिहररूप । गौळियांचें रूप सहज कृष्ण ॥२॥
हरिरूप घरीं सोळासहस्त्र नारी । तो बाळ ब्रह्माचारी गाई राखे ॥३॥
निवृत्ति रोकडे ब्रह्म माजिवडें । तो यशोदे पुढें लोणी मागे ॥४॥
 
जेथुनि उद्गारु प्रसवे ॐकारु । तोचि हा श्रीधरु गोकुळीं वसे ॥१॥
जनकु हा जनाचा जीवलगु साचा । तो हरि आमुचा नंदाघरीं ॥२॥
नमाये वैकुंठी योगियांचे भेटी । पाहतां ज्ञानदृष्टी नये हातां ॥३॥
निवृत्ति म्हणे देवा म्हणविता हे रावो । तो सुखानुभवो यादवांसी ॥४॥
 
योगियांचे धन तें ब्रह्म संपन्न । तो हा जनार्दन नंदाघरी ॥१॥
हरिरूप माये सर्वाघटीं आहे । दूध लोणी खाये गौळियांचे ॥२॥
चिंति अजामेळा नाम आलें मुखा । तो वैकुंठीच्या सुखा देत हरी ॥३॥
निवृत्तिचें धन जगाचें जीवन । नाम नारायण तरुणोपाव ॥४॥
 
देवामुकुटमणि ऐकिजे पुराणीं । तो हा चक्रपाणी नंदाघरें ॥१॥
नंदानंदान हरि गौळण गोरस । गोकुळीं हृषीकेश खेळतसे ॥२॥
हरि हा सकुमार भौमासुर पैजा । वोळलासे द्विजा धर्मा घरीं ॥३॥
निवृत्ति रोकडे नाम फाडोवाडें हरिरूप चहूंकडे दिसे आम्हां ॥४॥
 
वेदबीज साचें संमत श्रुतीचें । गुह्य या शास्त्रांचें हरि माझा ॥१॥
तो हरि खेळतु प्रत्यक्ष मूर्तिमंतु । कृष्ण मुक्ति देतु जीवघातें ॥२॥
अर्जुना साहाकरी द्रौपदी कैवारी । तो विदुराचे घरीं अन्न मागे ॥३॥
निवृत्तीचें धन गोकुळीं श्रीकृष्ण । यादव सहिष्णु हरि माझा ॥४॥
 
ब्रह्मादिक पूजा इच्छिती सहजा । जो गौळियांच्या काजा तिष्ठतुसे ॥१॥
देखिला वो माये चक्रभुज स्वाभावी । वारु ते वागवी अर्जुनाचे ॥२॥
याज्ञिक अर्पिती मंत्राच्या आहुती । तो द्रौपदियेप्रति भाजि मागे ॥३॥
निवृत्तिदैवत पूर्ण मनोरथ । पांडव कृतार्थ कृष्णनामें ॥४॥
 
ब्रह्मांड उतरंडी ज्याचे इच्छे घडी । तो उच्छिष्टें काढी धर्माधरीं ॥१॥
देखिला वो माये चक्रभुज स्वभावी । वारु ते वागवी अर्जुनाचे ॥२॥
याज्ञिक अर्पिती मंत्राच्या आहुती । तो द्रौपदियेप्रति भाजि मागे ॥३॥
निवृत्तिदैवत पूर्ण मनोरथ । पांडव कृतार्थ कृष्णनामें ॥४॥
 
निरालंब बीज प्रगटे सहज । तो गौळियांचें काज करी कृष्ण ॥१॥
हरि हा सांवळा वेधिलिया बाळा । माजि त्या गोपाला गायी चारी ॥२॥
वंदिती सुरगण ब्रह्मादिक चरण । तो यशोदेसि स्तन मागे हरि ॥३॥
निवृत्तीचें ध्यान मनाचें उन्मन । योगिया जीवन हरि माझा ॥४॥
 
वैकुंठदेवत देवामुगुटमणी । ऐकीजे पुराणीं कीर्ति ज्याची ॥१॥
तो हरी बाळक गोपिका कौतुक । गोपाळ सकळिक संवगडे ॥२॥
आदि शिवाजप जपतु अमुप । तें प्रत्यक्ष स्वरूप नंदाघरीं ॥३॥
निवृत्ति समाधि उगवली सकळिकां तारि तिन्ही लोकां एक्यानामें ॥४॥