शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 13 जून 2022 (16:12 IST)

संत निवृत्तीनाथांचे अभंग 101 ते 110

nivruttinath maharaj
गगन घोटींत उठि पृथ्वी सगळी दाटी । आपणचि पाठी कूर्म जाणा ॥१॥
कांसवितुसार अमृत सधर । भक्त पारावार तारियेले ॥२॥
उचलिती ढिसाळ सर्व हा गोपाळ । तो यशोदेचा बाळ नंदाघरीं ॥३॥
निवृत्ति सादर हरिरूप श्रीधर । आपण चराचर विस्तारला ॥४॥
 
गगनींचा गगनीं तेज पूर्ण धरणी । आपणची तरणी जगा यया ॥१॥
ब्रह्म माजीवडे गोपाळ संगती । वेद वाखणिती ज्याची महिमा ॥२॥
लोपती त्या तारा हारपे दिनमणि । तो खेळे चक्रपाणी गोपाळामाजी ॥३॥
निवृत्ति निधान श्रीरंग खेळतु । गोपिकासी मातु हळुहळु ॥४॥
 
निरपेक्षता मन अनाक्षर मौन्य । प्रकाश संपूर्ण तया ब्रह्मा ॥१॥
ऐसें रूप पाहा क्षरे दिशा दाहा । सर्वभावें मोहा एका कृष्णा ॥२॥
नित्यता अढळ नित्यपणें वेळे । विकाश आकळे नित्य तेजें ॥३॥
रूपस सुंदर पवित्राआगर । चोखाळ साकार पवित्रपणें ॥४॥
नेणें हें विषय आकार न माये । विकार न साहे तया रूपा ॥५॥
निवृत्ति तत्पर कृष्ण हा साकार । ॐतत्सदाकार हरि माझा ॥६॥
 
अद्वैत अमरकंदु हा घडला । ब्रह्मांडी संचला ब्रह्मासाचें ॥१॥
तें रूप कारण कृष्ण तेजाकार । सर्व हा आकार त्याचा असे ॥२॥
विराट विनटु विराट दिसतु । आपणचि होतु ब्रह्मसुख ॥३॥
निवृत्ति कोवळें आपण सोंविळें । त्यामाजी वोविलें मन माझें ॥४॥
 
जयामाजी दीक्षा हारपोनि जाये । द्वैत हेंही ठाये दुजेपणें ॥१॥
तें रूप रोकडें दिसे चहूंकडे । गोपाळ संवगडे खेळताती ॥२॥
उपराति योगियां तितिक्षा हारपे । मायकार लोपे कृष्णध्यानें ॥३॥
निवृत्ति तप्तर सर्व हा श्रीधर । मनाचा विचार हारपरला ॥४॥
 
रसज्ञ रसाचार रसामाजी वसे । जीवन हें सोसे असोस होय ॥१॥
तें रूप स्वरूपाचें रूपींच वोळले । कंदर्पें घोळिले नंदाघरीं ॥२॥
नाहीं त्या आकार अवघाचि वैकुंठ । अद्वैत घनदाट ब्रह्ममय ॥३॥
निवृत्ति नितंब कृष्ण तो स्वयंभ श्रीमूर्तीचे बिंब दिसे सर्व ॥४॥
 
अनंत रचना हारपती ब्रह्मांडे । हेळाचि वितंडे मोडीतसे ॥१॥
तें रूप राजस वसुदेव भोगी । देवक्रियेलागी वोळलेंसे ॥२॥
विचित्र रचना ब्रह्मांड कुसरी । निरालंब हरि गोकुळीं वसे ॥३॥
निवृत्ति संपदा गाताती गोविंदा । भोगिती मुकुंदा निजबोधे ॥४॥
 
व्याप्तरूपें थोर व्यापक अरूप । दुसरें स्वरूप नाहीं जेथें ॥१॥
तें अव्यक्त साबडें कृष्णाचें रूपडें । गोपाळ बागडें तन्मयता ॥२॥
उन्मनि माजिटें भोगिती ते मुनी । मुर्तिची पर्वणी ह्रदयीं वसे ॥३॥
निवृत्ति कारण कृष्ण हा परिपूर्ण । यशोदा पूर्णघन वोळलेंसे ॥४॥
 
गगन घांस घोंटी सर्व ब्रह्मांडें पोटीं । निमुनियां शेवटीं निरालंबीं ॥ १ ॥
तें ब्रह्म सांवळें माजि लाडेंकोडें । यशोदेमायेपुढें खेळतसे ॥ २ ॥
ब्रह्मांडाच्या कोटी तरंगता उठी । आप आपासाठीं होत जात ॥ ३ ॥
निवृत्तिचें ध्यान यशोदेचें धन वासुदेवखुण आम्हांमाजी ॥ ४ ॥
 
कारण परिसणा कामधाम नेम । सर्वाआत्माराम नेमियेला ॥१॥
तें रूप सुंदर सर्वागोचर । कृष्ण परिकर गोपवेषे ॥२॥
वेदादिक कंद ॐकार उद्बोध । साकार प्रसिद्ध सर्वाघटीं ॥३॥
निवृत्ति म्हणे धाम कृष्ण हा परम । सौख्यरूपें सम वर्ततसे ॥४॥