शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह - भाग १०

२८ भर्तृहरी नाथ
 
॥ स्मशानी धांवला । गोरखु बोधला । दत्त नाथें तेथें । पाठविला ॥६५॥
॥ नाण्याचे मडके । घेवोनिया हाती । रंगांनी नटवी । नाना वर्णी ॥६६॥
॥ भर्तरी समीपू । ठेंचा खाऊनिया । गोरक्षु मूर्च्छनी । पडे तंव ॥६७॥
॥ सांवरोनी पुन्हां उठोनियां शोके । आकाशु फोडोनी । टाहो करी ॥६८॥
॥ देखोनियां योगी । नोळखे गोरक्षु । विचारीता ‘मूर्खा ! । शोकी कां तूं ? ॥६९॥
॥ योगी त्यासी सांगे । ‘फुटले मडकें-पिंगलेच्या सरी । प्रिय माझें ॥७०॥
॥ उमगला राया । शोकू बुझाविला । गोरखु म्हणाला । पहा, राया ! ॥७१॥
॥ पहा या पिंगला । बोलावती तूज । ‘राखिताती बूज । सदा तूझी’ ॥७२॥
॥ भर्तरी शरणू । नाथ-पंथीयांसी । दीक्षा तंव त्यासी । गोरक्षु दे ॥७३॥
॥ भर्तरी लोहासी देतां स्वर्ण-वर्णु । परीसू गोरक्षू । मालू गणी ॥७४॥
 
२९ चौरंगीनाथ
 
॥ कोणे एके गांवी । शशांगरु राया । तपें करी, काया कृशांगारी ॥७५॥
॥ कृष्णा तुंगभद्रा । तीहीसी मिळणी । तपें तेथें करी । रामेश्वरी ॥७६॥
॥ लाभे त्यासी पुत्रु । नामें कृष्णांगरू । मदनाचा वर्णू । रूपू त्याचे ॥७७॥
॥ रुपें तारुण्यानें । मुसमुस वयू । द्दष्टी नारी जनी । नेघे कदा ॥७८॥
॥ राया शशांगरा । शरयू ते भार्या । एकाएकी आर्या । निवर्तली ॥७९॥
॥ भुजावंती अन्या । स्वरुपाची खाणी । शशांगरा राणी । मिरविते ॥८०॥
॥ भुजावंती माता । सापत्नता भावे । कृष्णांगरा पुत्रा झळंबिते ॥८१॥
॥ पितळेचे कानी । फुंकोनीयां राणी । कृष्णांगरा केले । शासनाते ॥८३॥
॥ हस्तपाय त्याचे । चारी तोडूनीयां । चौरंगी टाकीला । सुवर्णाच्या ॥८३॥
॥ कौंडिण्या पुरीची । ऐशी वार्ता होतां । तातें पुत्रा स्वतां । घातु केला ॥८४॥
॥ मच्छिंदरु गोरक्षु । दत्त दर्शनार्थी । मिरवीत येती । ग्रामातु या ॥८५॥
॥ कृणांगारू तया । चौरंगीचा नेला । गव्हरी ठेवीला । तपस्येसी ॥८६॥
॥ पर्वती चामुण्डा । फळें त्यासी देती । तपस्वी परी तो । उपवासी ॥८७॥
॥ पर्वती चामुण्डा । फळें त्यासी देती । तपस्वी परी तो । उपवासी ॥८७॥
॥ मुखी नाम जपे । नेत्र उर्ध्व द्दष्टी कंठी प्राण आले । भरोनियां ॥८८॥
 
३० काया - प्रवेश
 
॥ दत्तत्रेय नाथु । मच्छिंदरु गोरक्षु । त्रयी चाले यात्री । प्रयागासी ॥८९॥
॥ रायु तेथें एकू । कोंणी मृत झाला । शोकाकुली देखे जनू सारे ॥९०॥
॥ गोरक्षु बोलला । ताता ! मच्छिंदरा । रायासी जीववा । संजीवनें ॥९१॥
॥ मच्छिंदरे केला । कायेत प्रवेश । रायु तो स्मशानी । उभा राही ॥९२॥
॥ रायासी जे कांता । नामें जे रंवती । झाली गर्भवती । कांही काळे ॥९३॥
॥ पर्वती गव्हरी । मच्छिंदरू कायु । रक्षूनि गोरक्षु । राहीयला ॥९४॥
॥ त्रिविक्रमू राजा । रेवती त्या राणी । धर्मनाथा पुत्रा । प्रसवली ॥९५॥
॥ कामाठी घेवोनी । गव्हरी जावोनीज । देही तो शोधोनी । मच्छिंदरू ॥९६॥
॥ तोडोनी देहातें । कोल्ही, कुत्री जेथे । मांसान्नात त्यातें । तोषविले ॥९७॥
॥ सांबालयी शिवू । उमा कैलासासी । बोलावीती गणां । मांच्छिंद्रार्थी ॥९८॥
॥ हरी नारायणू । हरू नारायणू । एकीकृतू गणां । आज्ञापीती ॥९९॥
॥ ‘गण ! कण करा । मातीचा चाकोरा । देही तो विकारा । मच्छिंदरू ॥४००॥
॥ आज्ञा म्हणोनीयां । मच्छिंदरू देह । गणी तो शिवाच्या । जमा केला ॥४०१॥
॥ वीरभद्रा हाती । मच्छिंदरू देहू । संरक्षूना राही । कैलासीतो ॥४०२॥