बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

तुळस तोडताना हे 3 मंत्र जपा, नाही तर लागेल दोष

धार्मिक पौराणिक ग्रंथात तुळशीचे महत्त्व आहे. दररोज तुळस दर्शन केल्याने पाप नष्ट होतात तसेच तुळस पूजन केल्याने मोक्ष मिळतो. हिंदू धर्मात देव पूजा आणि श्राद्ध कर्मात तुळस आवश्यक मानली गेली आहे. तुळशीने पूजा केल्याने व्रत, यज्ञ, जप, होम-हवनामध्ये पुण्य प्राप्त होतं. जाणून घ्या तुळस तोडण्याचे 3 मंत्र:
- ॐ सुभद्राय नमः
- ॐ सुप्रभाय नमः
- मातस्तुलसि गोविन्द हृदयानन्द कारिणी 
नारायणस्य पूजार्थं चिनोमि त्वां नमोस्तुते ।।