1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 5 डिसेंबर 2022 (11:45 IST)

कोणत्या देवाला कोणत्या रंगाचे फूल अर्पित करावे, जाणून घ्या नियम आणि फायदे

हिंदू धर्मात कोणत्या पूजा-पाठ करताना देवी-देवतांना फळ आणि फूल अर्पित करण्याची पद्दत आहे. देवाला त्यांच्या आवडीचे फूल अर्पित केल्याने ते प्रसन्न होतात आणि भक्तांना इच्छित फळ देतात असे मानले जाते. तर चला जाणून घेऊ या की कोणत्या देवाला कोणत्या रंगाचे फूल अर्पित करावे ते-
 
गणपतीचे आवडते फूल
सर्व देवतांमध्ये गणपती प्रथम पूजनीय आणि कलयुगातील देव मानले गेले आहे. गणपतीला जास्वंदीची लाल रंगाची फुलं आवडतात. या व्यतिरिक्त चमेली किंवा पारिजात ही फुले देखील आवडतात.
 
भगवान विष्णूचे आवडते फूल
 
जुही, अशोक, चंपा, केतकी, वैजयंतीची फुले भगवान विष्णूला अर्पण करावीत. असे मानले जाते की यामुळे भगवान विष्णू खूप प्रसन्न होतात आणि जीवनात सुख आणि सौभाग्य प्राप्त होते.
 
दुर्गा देवीची आवडती फुले
दुर्गा देवीला लाल गुलाब आणि जास्वंदीची फुले अर्पित करणे शुभ मानले गेले आहे. या व्यतिरिक्त शंखपुष्पी अथार्त गोकर्णाची फुले, चंपा, पांढर्‍या रंगाचे कमळ आणि कुंदाची फुले, पलाश, तगर, अशेक आणि मौलसिरीची फुले, लोध, आणि शीशमची फुले, कन्यार, गुमा, डफरिया, अगत्स्य, माधवी, काशच्या मांजरीयाची फुलेही अर्पण करण्यात येतात.
 
महादेवाला आवडणारी फुले
देवांचे देव महादेव यांना धतूरा, नागकेसर, हरसिंगार आणि पांढर्‍या रंगाची फुले आवडतात. महादेवाला त्यांची आवडती फुले अर्पित केल्याने दांपत्य जीवनात सुख नांदतं.
 
श्रीकृष्णाला आवडतात ही फुले
आपल्या प्रिय पुष्पबद्दल महाभारतात युधिष्ठिराला सांगताना श्रीकृष्ण म्हणाले होते की - मला कुमुद, करवरी, चणक, मालती, पलाश आणि वनमाला फुले अती प्रिय आहे.
 
हनुमानाची आवडती फुले
हनुमानाला लाल रंगाचे फूल आवडतं. संकटमोटन हनुमंताची पूजा करताना लाल गुलाब, जास्वंदी अर्पित केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते.
 
शनी देवाला आवडतात ही फुले
शनी देवाला काळा आणि नीळा हा रंग प्रिय आहे. तसेच लाजवंतीच्या फुलांनी शनीची पूजा केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि साधकाला आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रासापासून मुक्त करतात.
 
पूजेसाठी कोणत्या प्रकाराची फुले वापरु नये?
देवाला कधीही शिळी, वाळलेली, कुजलेली फुले अर्पित करु नये.
 
कळलाच्या फुलांबद्दल मानले जाते की हे फूल दहा से पंधरादिवसापर्यंत शिळी होत नाही.
 
चंपाच्या कळीशिवाय कोणत्याही फुलाची कळी देवतांना अर्पण करू नये.
 
शास्त्रांप्रमाणे महादेवाला अर्पित केले जाणारे बिल्व पत्र सहा महिन्यापर्यंत शिळे मानले जात नाही. यांच्यावर पाणी शिंपडून पुन्हा शिवलिंगावर अर्पित करता येतं.
 
तुळशीचे पाने 11 दिवसांपर्यंत शिळवट होत नाही. यांवर दररोज पाणी शिंपडून पुन्हा अर्पित करता येतात.

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश