मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (15:35 IST)

Who is Bhadra कोण आहे भद्रा, काय आहे भद्राची कथा

पुराणात भद्राबद्दल एक कथा आहे. या मते भद्रा ही सूर्यदेवाची कन्या आणि शनीची बहीण आहे. असे मानले जाते की राक्षसांना मारण्यासाठी भद्रा गर्दभ (गाढव) चे मुख आणि लांब शेपूट आणि 3 पाययुक्त उत्पन्न झाली.
 
भद्रा काले वर्ण, लांब केस, मोठे दात आणि भयंकर रूप असलेली कन्या आहे. जन्म घेताच भद्राने यज्ञामध्ये विघ्न-बाधा पोहोचवण्यात सुरुवात केली आणि मंगल कार्यांमध्ये उपद्रव करायला लागली व सर्व जगाला तिने दुःख देणे सुरू केले.
 
तिच्या दुष्ट स्वभावाला बघून सूर्यदेवाला तिच्या विवाहाची काळजी होऊ लागली आणि त्यांच्या मनात विचार आला की या दुष्ट कुरूपा कन्येचा विवाह कसा होईल? सर्वांनी सूर्यदेवाच्या विवाह प्रस्तावाला नकार दिला. तेव्हा सूर्यदेवाने ब्रह्मांकडून योग्य सल्ला मागितला.
 
ब्रह्मांनी तेव्हा विष्टिला म्हटले की - 'भद्रे! बव, बालव, कौलव इत्यादी करणांच्या शेवटी तू निवास कर आणि जो व्यक्ती तुझ्या वेळात गृह प्रवेश व इतर शुभ कार्य करतील त्यांच्यात तू विघ्न घाल. जो तुझा सन्मान नाही करणार, त्यांचे कार्य तू बिघडवून दे.' या प्रकारे उपदेश देऊन ब्रह्मा आपल्या लोकात चालले गेले.
 
तेव्हापासून भद्रा आपल्या वेळेपासून देव-दानव-मानव समस्त प्राणांना कष्ट देण्यासाठी फिरायला लागली. या प्रकारे भद्राची उत्पत्ती झाली.