रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: बुधवार, 28 जानेवारी 2015 (16:05 IST)

मिस युनिव्हर्स 2014 ठरली कोलंबियाची पॉलिना वेगा!

मिस कोलंबिया पॉलिना वेगाने अमेरिकेच्या मियामीमध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स 2014चा किताब जिंकला. तर मिस यूएसएस या स्पर्धेत फर्स्ट रनर अप ठरली. याशिवाय मिस युक्रेन सेंकड रनर अप आणि मिस नेदरलँड थर्ड रनर अप होती.
 
भारताचे मिस युनिव्हर्स स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारी नोयोनीता लोध पहिल्या 10 सौंदर्यवतींमध्ये जागा मिळविण्यात अपयशी ठरली. बंगळुरूत राहणारी 21 वर्षीय नोयोनीताने 88 देशांमधील या स्पर्धेत पहिल्या 15मध्ये जागा बनवली होती. मिस युनिव्हर्स 2013 व्हेनेझुएलाची गेब्रिएला इस्लरने नव्या मिस युनिव्हर्सला मुकुट घातला. भारतीय सुंदरी लारा दत्तानं 2000 साली मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता.