रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: न्यूयॉर्क , गुरूवार, 26 मार्च 2015 (11:18 IST)

स्तन काढल्यानंतर अँजेलिनाने अंडाशयही काढले

कर्करोगाच्या भीतीने हॉलीवूडची अभिनेत्री अँजेलिना जोलीने अंडाशय व फॅलोपीन ट्यूबही काढून टाकले आहेत. दोन वर्षांपूर्वी तिने दोन्ही स्तन काढून टाकले होते.

न्यूयॉर्क टाइम्समध्ये लिहलेल्या लेखामध्ये  अ‍ॅँजेलिनाने म्हटले आहे की, माझी आई, आजी व मावशीचे कर्करोगाने निधन झाले आहे. ब्रका १ च्या जनुकामुळे मलाही कर्करोगाचा धोका होता. म्हणून मी स्तन काढून टाकल्यानंतर मी अंडाशय काढण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेमुळे माझ्या आरोग्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे तिने स्पष्ट केले.