गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (11:32 IST)

अभिनेत्री पामेला अँडरसने पांचव्यांदा लग्न केले

हॉलिवूड अभिनेत्री पामेला अँडरसन वयाच्या ५२व्या वर्षी तिने पांचव्यांदा लग्नगाठ बांधली आहे. 'बेवॉच' चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या अँडरसनने ‘बॅटमॅन’ चित्रपटाचा निर्माता जॉन पीटर्ससोबत लग्न गाठ बांधली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत होते. जॉन पीटर्स आणि अँडरसन यांच्यात तब्बल २० वर्षांचं अंतर आहे.
 
अँडरसन आणि जॉन पीटर्स यांनी मालिबू बीचवर लग्न केले. तिने जॉन पीटर्ससाठी एक कविता देखील लिहिली आहे. तिने या कवितेला 'द ओरिजनल बॅण्ड बॉय ऑफ हॉलिवूड' (The Original Bad Boy Of Hollywood) असं नाव देखील दिलं आहे. 
 
याआधी पामेलाने टॉमी ली आणि किड रॉक यांच्याशी लग्न केलं होतं. त्यानंतर पोकर खेळाडू रिक सॅलोमॉन याच्याशी तिने दोनदा लग्नगाठ बांधली होती.