क्रिकेट विश्वचषक स्पर्धा : भारत, आफ्रिकेकडून आव्हान - चॅपेल
विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या निवडीसंदर्भातील काही निर्णयांबाबत माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी नाराजी व्यक्त केली आहे, मात्र तरीही त्यांनी आपल्या संघाची बाजू घेताना, यजमान ऑस्ट्रेलियाला १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार्या क्रिकेटच्या महाकुंभामध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडूनच सर्वात कठीण आव्हान मिळेल, असे म्हटले आहे. चॅपेल यांनी 'द डेली टेलिग्राफ'मधील आपल्या स्तंभात म्हटले आहे की, 'ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिका आणि भारताकडूनच कडवे आव्हान मिळेल आणि ब्रँडन मॅक्युलमच्या आक्रमक नेतृत्वाखालील न्यूझीलंडचा संघही छुपा रुस्तम सिद्ध होऊ शकेल.