3 वर्षाच्या मुलीने खेळता खेळता स्वतःवर गोळी झाडली,सुदैवाने बचावली
घरात लहान मुले असले की , त्यांच्याकडे बारीक लक्ष ठेवावे लागते. अन्यथा लहान मुले अनेकदा गैरवर्तन करून आपला जीव धोक्यात घालतात. त्यामुळे त्यांची काळजी घेताना प्रत्येक पालकाने काळजी घेणे गरजेचे आहे. आता फ्लोरिडातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 3 वर्षाच्या मुलीने खेळताना बंदूक उचलली आणि स्वतःवर गोळी झाडली. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती मुलगी स्वत:वर गोळी झाडताना दिसत आहे.सेरेनटी असे या चिमुकलीचे नाव आहे.
ही घटना फ्लोरीडाची आहे. या मुलीचे पालक कामात व्यस्त होते. ही मुलगी घरातच खेळत होती. खेळता- खेळता तिने सोफ्यावर ठेवलेली बंदूक उचलली आणि स्वतःवर गोळी झाडली. त्यांनतर मुलीच्या किंचाळण्यांचा आवाज ऐकून एक जवळच असलेल्या व्यक्तीच्या कानावर गेला. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली आणि तिला सांभाळू लागतो. आणि घरातील इतर सदस्यांना आवाज देतो. मुलीला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं.
मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला निक्लॉस चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तेथे तिच्या हातातील गोळी काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली असून मुलीची प्रकृती आता स्थिर आहे.
व्हायरल होत असलेल्या या घटनेचा व्हिडिओ मुलीची आजी रॉबिन फुलर यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. जवळ असलेला व्यक्ती त्यांचा नातेवाईक असून बेकायदेशीर बंदूक बाळगण्यासाठी त्याला पोलिसानी अटक केली. नंतर त्याला बॉन्डवर सोडण्यात आले. मुलीच्या आजीने म्हटले की सुदैवाने मुलीला जास्त काही झाले नाही. नाहीतर अघटित घडले असते.
Edited by - Priya Dixit