बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 8 ऑगस्ट 2021 (15:05 IST)

ग्रीस च्या जंगलामध्ये भीषण आगीमुळे विध्वंस

ग्रीसमध्ये शनिवारी 3 वेगवेगळ्या ठिकाणी जंगलात लागलेल्या भीषण आगीमुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. प्राचीन ऑलिम्पिया, ग्रीसच्या दक्षिण पेलोपोनीज द्वीपकल्पातील फोसिडा आणि अथेन्सच्या उत्तरेकडील मध्य ग्रीसमध्येही मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. प्राचीन ऑलिम्पियामधील आग प्राचीन स्थळापासून दूर गेली आहे.
 
अहवालांनुसार,दोन तटरक्षक जहाजांसह एकूण 10 जहाजे, इव्हियाच्या उत्तर टोकाजवळील समुद्रकिनाऱ्यावरील पेफकी येथे आवश्यक असल्यास अधिक रहिवासी आणि पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी तयार आहेत.
 
अत्यंत गरम वाऱ्यांमुळे शुक्रवारी एका अग्निशमन दलाचा मृत्यू झाला आणि गेल्या आठवड्यात किमान 20 लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
 
तथापि, शुक्रवारी, ग्रेटर अथेन्स परिसरात, मध्य आणि दक्षिण ग्रीसमध्ये, दोन प्रकरणांमध्ये हेतुपुरस्सर आग लावल्याच्या संशयावरून 3 लोकांना अटक करण्यात आली आहे.