बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (10:35 IST)

चीन मध्ये उडत्या विमानात लहान मुलीला टॉयलेटमध्ये अनेक तास केले बंद

aeroplane
प्रवाशांनी रडणाऱ्या मुलाला विमानातील टॉयलेटमध्ये बंद केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे  चीनमध्ये संतापाची लाट पसरली आहे. चिनी सोशल मीडियावर यातील एका महिलेने एक व्हिडीओ पोस्ट केल्याने ही घटना चर्चेत आली आहे, तसेच ज्यामध्ये एक वर्षाची मुलगी शौचालयात बंद असल्याचे दाखवण्यात आले आहे.  
 
"तू रडणे थांबवत नाही तोपर्यंत आम्ही तुला बाहेर काढणार नाही," असे व्हिडिओमध्ये महिला म्हणाली आहे. तसेच मुलीचे रडणे थांबताच महिलेने तिला उचलले आणि म्हणाली, तू पुन्हा आवाज केलास तर आम्ही टॉयलेट मध्ये बंद करू. मिळालेल्या माहितीनुसार गुईयांगहून शांघायला जाणाऱ्या जुनेयाओ एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये 24ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. मुलगी तिच्या आजी-आजोबांसोबत प्रवास करत होते आणि तीन तासांच्या विमान प्रवासादरम्यान ती सतत रडत होती. 

Edited By- Dhanashri Naik