1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 10 जून 2017 (12:47 IST)

2050 पर्यंत तीन कोटी चीनी पुरुष राहतील अविवाहित

एक अपत्य धोरणामुळे स्त्री पुरुष गुणोत्तरात मोठी तफावत पडलेल्या चीनमध्ये आगामी काळात सुमारे तीन कोटी परुषांना आपल्यासाठी परदेशातून पत्नी शोधून आणावी लागेल किंवा मग अविवाति राहावे लागेल. चीनमधील सामाजिक विज्ञान अकादमीच्या शास्त्रज्ञांनी हा इशारा दिला असून त्यांच्या म्हणण्यानुसार देशात 35 ते 59 वयोगटातील अविवाहित पुरुषांची संक्या 2020 मध्ये 1.5 कोटी होईल. हाच आकडा 2050 मध्ये दुपटीने वाढून तीन कोटींवर जाऊ शकतो. अशा परिस्थितीत अल्पशिक्षित मागासवर्गातील पुरुषांवर अविवाहित राहण्याची वेळ येण्याची दाट शक्यता आहे. कारण फक्त प्राथमिक शिक्षण वा त्यातून कमी शिक्षण घेणार्‍या पुरुषांच्या संख्येत 2010मध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली, हे त्यामागचे एक कारण आहे. नानकाई विद्यापीठातील प्राध्यापक आणि कुटुंब नियोजन धोरणाचे विशेषज्ञ युआन शिन यांनी सांगितल की, पुढच्या तीन दशकामध्ये अशा पुरुषांची संख्या तीन कोटींवर पोहोचू शकते.