1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 3 डिसेंबर 2016 (12:16 IST)

अमेरिकन कंपन्यांना ट्रम्प यांचा इशार्‍याने भारतीयांच्या नोकर्‍या धोक्यात!

आपला कारभार देशाबाहेर घेऊन जाणार्‍या कंपन्यांना अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे. ज्या कंपन्या असा प्रयत्न करतील त्यांना त्याचे परिणामही भोगावे लागतील असे त्यांनी म्हटले आहे. एसी बनवणार्‍या कॅरिअर या कंपनीने इंडियाना पोलिस येथील प्लांट बंन करून तो मेक्सिकोमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला होता. कॅरिअरच्या या निर्णयामुळे सुमारे 1100 लोकांच्या नोकर्‍यांवर गंडांतर आल होते, पण त्यांना कर सवलत दिल्यानंतर कंपनीने हा निर्णय मागे घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा इशारा दिला असल्याचे बोलले जाते. 
 
आपले प्रशासन कॉर्पोरेट कर कमी करण्याबाबत विचार करत आहे. यामुळे अनेक कंपन्या अमेरिकेत राहण्याचा निर्णय घेतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. परंतु, ज्या कंपन्या आपले कामकाज बाहेर देशातून चालवतील त्यांना मोठा कर द्यावा लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले. या कंपन्या दंड न भरता अमेरिका सोडू शकणार नाहीत. कॅरिअर प्रकरणाचे वृत्त वाहिन्यांवर दाखवण्यात आल्यानंतर त्याची दखल घेण्यात आली. हे वृत्त पाहिल्यानंतर आपल्याला निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची आठवण झाल्याचे ते म्हणाले.