पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ,अटक वॉरंट जारी
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.इस्लामाबादच्या मरगल्ला पोलिस स्टेशनच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी 20 ऑगस्ट रोजी इम्रान खान यांच्या विरोधात अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जेबा चौधरी यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल अटक वॉरंट जारी केले आहे, असे पाकिस्तानच्या जिओ न्यूजने म्हटले आहे.
इम्रान खान यांनीही शनिवारीच इस्लामाबाद उच्च न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जेबा चौधरी यांना धमकावल्याप्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले असून, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांने आपण सीमा ओलांडल्याचे आपल्या लक्षात आल्याचे म्हटले आहे.. इस्लामाबादचे सदर दंडाधिकारी अली जावेद यांनी ऑगस्टमध्ये एका रॅलीदरम्यान एका महिला न्यायाधीशाला धमकावल्याच्या तक्रारीवरून दहशतवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By - Priya Dixit