रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 23 एप्रिल 2024 (11:53 IST)

हवेत हेलिकॉप्टरची टक्कर,10 जणांचा मृत्यू

परेड सराव दरम्यान मलेशिया नौसेनेचे दोन हेलिकॉप्टरची एकमेकांना जोरदार तकार झाली. ही टक्कर एवढी भीषण होती की यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 
 
मलेशियामध्ये नौसेनेचे दोन हेलिकॉप्टर परेड सराव करतांना अचानक एकमेकांसमोर आले व एकेमकांना जोरदार टक्कर झाल्यामुळे या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सकाळी घडला अशी माहिती समोर आली असून, ही घटना लुमुट नेवल बेस येथे घडली आहे. 
 
मलेशियाची नेवीचा सराव सुरु होता. मिळालेल्या माहितीनुसार हा सराव लुमुटच्या रॉयल मालिशियाई नेवी स्टेडियम मध्ये सुरु होता. याच दरम्यान हा भयंकर अपघात घडला. हेलिकॉप्टरची टक्कर जेव्हा झाली तेव्हा हेलिकॉप्टर रॉयल मलेशियाई नौसेना परेडसाठी अभ्यास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये या हेलिकॉप्टरमध्ये असलेले 10 चालक सदस्य यांचा मृत्यू झाला आहे. यांची ओळख पटण्यासाठी त्यांना लुमुट आर्मी बेस रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.  

Edited By- Dhanashri Naik