बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

पृथ्वीवर दोन हजार वीस साली हिमयूगाची शक्यता

पृथ्वीवर दोन हजार वीस साली सुमारे 10 वर्षांसाठी हिमयूग परतण्याची चिन्ह आहेत कारण सूर्याचं तापमान कमी होत आहे. कॅलिफोर्निया झालेल्या एका संशोधनातून हे वास्तव समोर आलं आहे. 2020 ते 2030 या काळात सूर्याचं तापमान कमी होणार आहे.

सूर्याच्या तापमान चक्रांचा नुकताच शोध लागलाय. या चक्रानुसार सूर्याचं तापमान कमी होण्याचं सत्र 2020 मध्ये सुरू होणार आहे. सूर्याचं तापमान कमी झाल्यानं पृथ्वीवरही तापमानात मोठी घट होणार आहे. पुढचे दहावर्ष तापमान कमी होण्याचा हा सिलसिला सुरू राहील. या वेळ एक वेळ अशी येईल की लंडन शहरातून वाहणारी थेम्स नदी संपूर्णपणे गोठेल असा अंदाज आहे. आता सूर्याचं तापमान कमी होण्याच्या या चक्रामुळे भारतावर नेमका कसा परिणाम होईल हे आताच सांगणं कठीण असलं, तरी दोन वर्षानंतरचा उन्हाळा काहीसा सुखकर होईल असं म्हणायला हरकत नाही.