शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 14 मे 2024 (21:21 IST)

डुकराची किडनी प्रत्यारोपित केलेल्या माणसाचा दोन महिन्यानंतर मृत्यू

विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. वैद्यकीय शास्त्र देखील आज खूप पुढे गेलं आहे.आज अनेक लोक मृत्यू नंतर अवयवदान करतात. अवयवदानासाठी लोकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. वैद्यकीय शास्त्रात दररोज नवेनवे प्रयोग केले जात आहे. प्राण्यांचे अवयव मानवी शरीरात वापरता यावे या साठी तज्ञ संशोधन करत आहे. प्राण्यांचे अवयव मानवाला प्रत्यारोपित केले जात आहे.  अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये एका व्यक्तीवर पहिल्यांदा डुकराची किडनी प्रत्यारोपित करण्यात आली. हा जगातील एकमेव व्यक्ती होता. त्याचा दोन महिन्यानंतर मृत्यू झाला.रिक स्लेमन असे या व्यक्तीचे नाव आहे. 
 
रिक स्लेमन, 62, यांना गेल्या वर्षी किडनीच्या गंभीर आजाराचे निदान झाले होते. हा आजारही शेवटच्या टप्प्यात होता. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे किडनी प्रत्यारोपणाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. डॉक्टरांनी त्याला डुक्कराची किडनी प्रत्यारोपणासाठी पटवून दिले. जे लोक अवयवदानाच्या प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी हा आशेचा किरण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मार्चमध्ये त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण करण्यात आले.
 
सुमारे चार तासांच्या शस्त्रक्रियेनंतर किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले, त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, नवीन किडनी वर्षानुवर्षे टिकू शकते, असे डॉक्टरांचे मत आहे. ते म्हणाले की, प्राणी ते मानवी प्रत्यारोपण यशस्वी करण्यासाठी आम्ही सातत्याने संशोधन करत आहोत. डॉक्टरांनीही रिक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
 
Edited by - Priya Dixit