सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (13:58 IST)

कोरोनाच्या धास्तीने तीन महिने विमानतळावर लपला होता आप्रवासी भारतीय

कॅलिफोर्नियामधील रहिवासी असलेल्या आदित्य सिंगवर गंभीर गुन्ह्याखाली विमानतळाच्या प्रतिबंधित क्षेत्रात चुकीच्या पद्धतीने प्रवेश केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सिंग गेल्या तीन महिन्यांपासून शिकागोच्या ओ'हारे विमानतळावर थांबले होता. सिंह (वय 36) याने पोलिसांना सांगितले की कोरोना विषाणूच्या साथीमुळे प्रवास करण्यास घाबरू लागला होता. त्याच्यावर विमानतळ कर्मचार्‍यांचा बॅज चोरल्याचा देखील आरोप आहे. जामिनासाठी एक हजार डॉलर्स दिले तर त्याला सोडण्यात येईल, परंतु पुन्हा विमानतळावर प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे. 
 
कुक काउंटीच्या न्यायाधीश सुझाना ऑर्टिज यांनी कोणालाही नकळत इतके दिवस एखाद्या सुरक्षित क्षेत्रात कसे जगता येईल याबद्दल चिंता व्यक्त केली. न्यायाधीश म्हणाले, "आरोपित कालावधीसाठी कोर्टाला ही तथ्य व परिस्थिती अत्यंत धक्कादायक वाटली." न्यायाधीश म्हणाले, "बनावट बॅज लावून विमानतळाच्या सुरक्षित भागामध्ये राहणे धोकादायक आहे आणि लोकांच्या सुरक्षित हवाई प्रवासासाठी विमानतळांवर पूर्णपणे सुरक्षित असणे आवश्यक आहे. मला असे वाटते की ह्या आरोपावरून तो व्यक्ती संपूर्ण समुदायासाठी धोका आहे. "
 
कर्मचार्‍यांना संशयास्पद वाटले
सुनावणी दरम्यान सरकारी वकील कॅथलीन हॅगर्टी म्हणाले की युनायटेड एअरलाईन्सच्या दोन कर्मचार्‍यांनी सिंह याला पाहिले आणि त्याचा संशय आला. कर्मचार्‍यांनी सिंहला ओळखपत्र दाखविण्यास सांगितले असता त्यांनी ऑपरेशन मॅनेजरचे ओळखपत्र दाखविले, त्या मॅनेजरने ऑक्टोबरमध्येच बॅज हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर कर्मचार्‍यांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर सिंग याला अटक करण्यात आली.
 
हॅगर्टी म्हणाले की सिंग याने पोलिस अधिकार्‍यांना सांगितले की “कोविड -19मुळे घरी जायला घाबरत होता.” सिंग म्हणाला की विमानतळावर आपल्याला बॅज मिळाला आहे आणि इतर प्रवाशांनी दिलेल्या अन्नाच्या मदतीने ते आपले पोट भरून घेत होता. लॉस एंजेल्सचा रहिवासी सिंग शिकागो येथे का आला हे अस्पष्ट आहे, असे बचाव पक्षाचे वकील कोर्टनी स्मॉलवुड म्हणाले. स्मॉलवूडच्या म्हणण्यानुसार, सिंह बेरोजगार आहेत आणि त्याचा या क्षेत्राशी संबंध अस्पष्ट आहे. सिंग याला कोर्टाकडून जामीन मिळाला. त्याची कोणतेही गुन्हेगारी नोंद नाही.