शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2022 (13:17 IST)

राजस्थानच्या एनआरआय ने चंद्रावर जमीन खरेदी करून नागरिकत्व मिळवले

चंद्रावर जमीन खरेदी करण्याच्या शर्यतीत राजस्थानच्या एका व्यावसायिक NRI ने चंद्रावर 14 एकर जमीन खरेदी करण्याचा दावा केला आहे. आणि त्यांना तिथे नागरिकत्व देखील मिळाले आहे असे सांगितले आहे. 
 
मूळचे झुंझुनू जिल्ह्यात राहणारे NRI व्यावसायिक असलेले अभिलाष झांगिड यांनी सांगितले की, ते जेव्हा फ्लोरिडा येथे त्यांना ल्यूनार सोसायटीने चंद्रमावरील जमीन विकण्याची घोषणा केली असता त्यांना चंद्रावर जमीन खरेदी करण्याची इच्छा झाली आणि त्यांनी जमीन खरेदी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील दिले आणि चंद्रावर जमीन खरेदी केली. या साठी ल्यूनार सोसायटीने त्यांना सर्व कागदपत्र देऊन  तिथले नागरिकत्व देखील देण्यात आले आहे. 
 
अभिलाष यांना ल्यूनार सोसायटी कडून बोर्डिंग पास आणि तिकीट देखील देण्यात आले आहे. अभिलाष म्हणतात की त्यांना कधी चंद्रावर जाण्याची संधी मिळाल्यावर ते नक्की जातील. ल्यूनार सोसायटीची चंद्रावर वेगवेगळी ठिकाण आहे. अभिलाष यांना शी ऑफ मस्कोव्हीस आणि लँड ऑफ हॅप्पीनेस या ठिकाणी 14 एकर जमीन देण्यात आली आहे.