बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , सोमवार, 4 फेब्रुवारी 2019 (12:13 IST)

डोनाल्ड ट्रम्प अेरिकेवर आणीबाणी लादण्याच्या तयारीत

अमेरिकेत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी देशाच्या सीमेवर भिंत बांधण्याचा निर्णय ट्रम्प सरकारने घेतला होता. परंतु त्यास अमेरिकेच्या संसदेकडून मंजुरी मिळवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय पक्का केला असल्याचे वृत्त अमेरिकेतील दैनिकांनी प्रकाशित केले आहे.
 
मेक्सिकोतून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी अमेरिकेच्या सीमेवर भिंत बांधण्याच्या प्रकल्प ट्रम्स सरकारने संसदेसरमोर मांडला होता. परंतु अमेरिकेतील ट्रम्प यांच्या विरोधी पक्षातील सदस्यांनी या प्रकल्पाला विरोध करीत त्यांचा हा प्रस्ताव रोखून धरला आहे. तसेच भिंतीसाठी पैसा मिळवण्यासाठी अमेरिकेच्या संसदेकडून परवानगी घ्यावीच लागेल. परंतु आणीबाणी जाहीर केली तर ट्रम्प यांना संसदेची अनुमती न घेता या प्रकल्पासाठी पैसा मिळवणे सोपे जाणार आहे. त्यामुळे देशात आणीबाणी लागू करण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे. 
 
याबाबत बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, सीमा सुरक्षेबाबत विरोधी पक्षासोबत (डोमेक्रॅटिक) चर्चा म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. घुसखोरी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत अमेरिकी प्रतिनिधी सभेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांची भूमिका पूर्णपणे चुकीची आहे.