रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (15:46 IST)

80 दशलक्ष वर्षांपूर्वी अटलांटिक महासागरात विचित्र प्राणी राहत होते, असे अभ्यासातून समोर आले आहे

सागरी जीवना बद्दल एका नवीन अभ्यासाने  निदर्शनास आले आहे की ,80 दशलक्ष वर्षे म्हणजे 8 कोटी वर्षापूर्वी,  मानवी आकाराच्या विचित्र समुद्र प्राणी अटलांटिक महासागरात पोहायचे .  त्यांची एकूण लांबी सुमारे 6 फूट होती. विचित्र पोत असलेल्या या प्राण्यांचे शरीर स्क्विड आणि गोगलगायसारखे होते.
 
अहवालानुसार, एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की सुमारे 80 दशलक्ष वर्षांपूर्वी, मानवी आकाराचे समुद्री प्राणी अटलांटिक महासागरात पोहायचे. ते सुमारे 6.6 दशलक्ष वर्षांपूर्वी नामशेष झाले. त्यांच्याबद्दलचा पहिला पुरावा 1895 मध्ये सापडला.
 
तपासणीच्या आधारे, शास्त्रज्ञांना असे आढळून आले की सुमारे 80 दशलक्ष वर्षांपूर्वी अटलांटिक महासागराच्या दोन्ही बाजूला पी. सॅपेनराडेन्सिस आढळले होते. हे कदाचित पॅरापुझोसिया लेप्टोफिला या लहान प्रजातीपासून विकसित झाले आहे, जे फक्त 3.2 फूट पर्यंत वाढते.
 
154 जीवाश्मांवरील अभ्यासात अलीकडे समान आकाराचे काही अमोनाईट जीवाश्म देखील सापडले आहेत, जे या जीवाबद्दल मोठे प्रश्न उपस्थित करतात. एवढ्या मोठ्या आकाराचा जीव कधी आणि कसा विकसित झाला हा सर्वात मोठा प्रश्न आहे.