शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (18:27 IST)

Taliban: मौलाना रहीमुल्लाह हक्कानी स्फोटात ठार, कृत्रिम पायात लपवलेल्या आयईडीचा स्फोट

अफगाणिस्तानच्या राजधानीतील मदरशात झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात तालिबानचा सर्वोच्च धर्मगुरू रहीमुल्लाह हक्कानी मारला गेला. तालिबानच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोराने त्याच्या कृत्रिम पायात लपवलेल्या आयईडीचा स्फोट केला. रहिमुल्ला आयएसविरोधात सक्रिय होता. या हत्येची जबाबदारी आयएसने घेतली आहे.
 
रहिमुल्लाह हक्कानी हे तालिबानचे अंतर्गत मंत्री आणि हक्कानी नेटवर्कचे नेते सिराजुद्दीन हक्कानी यांचे वैचारिक गुरू मानले जात होते. रहिमुल्ला हा सोशल मीडियावर तालिबानचा चेहरा होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. यापूर्वी हक्कानीवर दोन हल्ले झाले होते. ते तालिबान लष्करी आयोगाचे सदस्य राहिले आहेत. त्या काळात अमेरिकन सैन्याने त्यांना अटक करून अनेक महिने बग्राम तुरुंगात ठेवले होते.
 
रहिमुल्लाहच्या मृत्यूला हक्कानी नेटवर्कचा मोठा धक्का मानला जात आहे. नेटवर्कचा वैचारिक चेहरा म्हणून त्यांनी अरब देशांमध्ये त्याचे प्रतिनिधित्व केले. पाकिस्तान आणि इतर ठिकाणांहून निधी मिळवून देणारा तो मुख्य चालक होता.