शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 16 जुलै 2018 (10:13 IST)

ट्रम्प यांनी अनेक शाही प्रोटोकॉल तोडले

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्याच अधिकृत ब्रिटन भेटीत अनेक शाही प्रोटोकॉल तोडत उपस्थितांना मोठ्या आश्चर्यात टाकले. विंडसर कॅस्टल राजवाडा भेटीत ट्रम्प यांनी इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना पाठ दाखवली. तसेच स्वागत सोहळ्यात चक्क महाराणींना आपली वाट पाहायला लावली. त्यानंतर गार्ड ऑफ हॉनरच्या वेळेस ते महाराणींपुढे चालत होते.
 
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प प्रथमच ब्रिटन दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची विंडसर कॅस्टल राजवाड्यात भेट घेतली. या भेटीत ट्रम्प यांनी ब्रिटनच्या शाही प्रोटोकॉलना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. इंग्लंडच्या शाही नियमांनुसार महाराणींना भेटायला येणाऱ्या पाहुण्यांना राजवाड्यात अनेक प्रोटोकॉल पाळायला लागतात. पाहुण्यांनी महाराणींना आपली पाठ दाखवायची नसते. शिवाय स्वागत सोहळ्यात पाहुण्यांनी महाराणीच्या आधी स्वागत मंचावर पोचायचे असते. हे सर्व प्रोटोकॉल ट्रम्प यांनी तोडल्याने ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे.