रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (08:42 IST)

ब्रिटेन : लिव्हरपूल शहरातील महिला रुग्णालयासमोर कारचा स्फोट, एक ठार तर एक जखमी

ब्रिटेनच्या उत्तरेकडील लिव्हरपूल शहरातील महिला रुग्णालयासमोर रविवारी कार बॉम्बचा स्फोट झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. या घटनेनंतर देशाच्या दहशतवादविरोधी विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कारमध्ये स्फोट झाला ती टॅक्सी होती आणि स्फोटाच्या काही वेळापूर्वी ती हॉस्पिटलसमोर सोडण्यात आली होती. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाची घटना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता घडली. पोलीस आणि दहशतवाद विरोधी विभाग संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत या प्रकरणाला दहशतवादी घटना म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. या प्रकरणी तिघांना अटक केली आहे 
 
जखमी व्यक्तीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचा जीव धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सर्वसामान्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. लिव्हरपूलचे महापौर जॉन अँडरसन यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. रुग्णालयाने जारी केलेल्याअहवालानुसार, सध्या रुग्णालयातील हालचालींवर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत.