सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Modified: लंडन , सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (12:27 IST)

नेरोली मेडोव्जचे आयपीएलमध्ये पदार्पण

आयपीएलचा तेरावा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 19 सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेला असणारे ग्लॅमर हादेखील नेहमी एक चर्चेचा विषय असतो. खेळाडूंच्या मुलाखती घेण्यासाठी असलेला अँकर, त्यांची ड्रेसिंग स्टाईल हा स्पर्धेदरम्यान सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो.
 
आयपीएलच्या तेराव्या हंगामात आणखी एक प्रसिद्ध चेहरा आपल्याला पाहायला मिळणार आहे. फॉक्स स्पोर्टस्‌ वाहिनीसोबत कार्यरत असलेली महिला क्रीडा पत्रकार नेरोली मेडोव्ज यंदा आयपीएलमध्ये काम करताना दिसणार आहे.