रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मार्च 2023 (16:32 IST)

IPL 2023: टॉस ते प्लेइंग 11 पर्यंत अनेक नियम बदलले आहेत, सर्व डिटेल्स जाणून घ्या

प्रेक्षकांच्या पसंतीनुसार IPL 2023 अधिक रोमांचक बनवण्यासाठी या हंगामात काही मोठे बदल केले जात आहेत. टॉस आणि पेनल्टी आणि प्लेइंग 11 च्या नियमांबाबत काही नवीन नियम लागू केले जातील. T20 क्रिकेटमध्ये नाणेफेक मोठी भूमिका बजावते आणि त्याचा परिणाम अनेकदा मोठ्या प्रमाणात होतो. नवीन नियमांनुसार काय बदल होणार आहेत ते जाणून घ्या.
  
 नाणेफेकीनंतर संघ  करेल प्लेइंग 11 ची घोषणा  
इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये अनेक नवीन नियम लागू केले जात आहेत. एका क्रिकेट वेबसाईटनुसार, आता संघ नाणेफेकपूर्वी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करू शकत नाहीत. टी-20 क्रिकेटमध्ये नाणेफेकीची मोठी भूमिका आहे आणि आतापर्यंत नियमानुसार, नाणेफेकीपूर्वी संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची यादी मॅच रेफरीला देत असत. आता त्यात बदल करण्यात येत असून नाणेफेकनंतर कर्णधार प्लेइंग 11 ची यादी शेअर करेल. अशा परिस्थितीत, कर्णधार त्याच्यासोबत दोन याद्या आणू शकतो आणि नाणेफेकीच्या निकालानुसार प्लेइंग 11 ठरवू शकतो.
 
सामन्यादरम्यान 5 धावांचा दंड आकारला जाईल
आयपीएल 2023 मध्ये पेनल्टी रनबाबतही मोठा बदल करण्यात आला आहे. जर एखाद्या संघाचा यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक सामन्यात अनावश्यक हालचाली करत असेल तर अशा स्थितीत संघावर पाच धावांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. याशिवाय निर्धारित वेळेत षटक पूर्ण न करणाऱ्या संघावर दंडही आकारला जाईल. हे पेनल्टी ओव्हर असेल आणि या ओव्हरमध्ये 4 खेळाडूंना 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवण्याची परवानगी असेल. 
Edited by : Smita Joshi