शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

आजवरचे 'अनफिट' आयपीएलसाठी ‍'फिट'!

PR
इंडियन प्रीमिअर लीगचा चमत्कार खरोखर वेगळाच आहे. भन्नाट मनोरंजनामुळे या स्पर्धेने क्रिकेटप्रेमींना भुरळ घातली असताना खेळाडूंनाही या स्पर्धेपासून दूर राहावेसे वाटत नाही, यामागचे कारण कुणास ठाऊक, परंतु आजवर दुखापतीने त्रस्त असलेले भारताचे काही स्टार खेळाडू ही स्पर्धा सुरू होताच पूर्णपणे फिट झाले आहेत. यामधील काही खेळाडू तर भारतीय संघाचे सदस्य असतानाही दुखापतीमुळे मैदानाबाहेर होते. या खेळाडूंनी दुखापतीमुळे स्थानिक स्पर्धामध्येही सहभाग घेतला नव्हता.

जहीर खान, आशीष नेहरा, उमेश यादव आणि इरफान पठानसारख्या वेगवान गोलंदाजांसह युवा फलंदाज मनोज तिवारी खेळाडू आजवर दुखापतीमुळे मैदानापासून दूर असताना आयपीएलसाठी मात्र पूर्णपणे सज्ज झाले अहते. अलीकडेच स्थानिक स्पर्धांसाठीही स्वत:ची दुखापत समोर करून बाहेर बसणारे हे खेळाडू अचानक पूर्णपणे तंदुरुस्त कसे झाले. हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांनी आयपीएलसाठी आपली तंदुरुस्ती राखून ठेवली होती काय, की आयपीएलसाठी हे खेळाडू आपली कारकीर्दच पणाला लावत आहेत, असे विविध प्रश्नही या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.