शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

कामगिरीत सातत्य राहिले नाही : जयवर्धने

WD
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने सहाव्या आपीएल स्पर्धेत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा 5 गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर दिल्ली संघाचा कर्णधार महेला जवर्धने हा निराश झाला. आमच्या संघाच्या कामगिरीत सातत्य नसल्यामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागला, असे त्याने सांगितले.

दिल्लीचे 8 सामन्यात 7 पराभव ठरले आहेत. परतीच्या लढतीत मुंबई इंडियन्सविरुध्द त्यानी एकमेव विजय मिळविलेला आहे. 7 पराभव झाले असल्यामुळे आमचा संघ सक्षम नाही हेच सिध्द होत आहे, असे तो म्हणाला. आता आम्हाला या पुढे आपीएलमधील आमचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी उर्वरित आठच्या आठ सामने जिंकावे लागतील, असे त्याने सांगितले.