शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

केकेआरची विजयी सलामी

WD
कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ब्रेट लीने डावाच्या पहिल्याच चेंडूवर उन्मुक्त त्रिफळा उडवून धडाक्यात सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार माहेला जयवर्धनेने दुसर्‍या गड्यासाठी 44 धावा जोडल्यानंतर सुनील नारायणने वॉर्नरला 21 धावांवर बाद केले. त्यानंतर मनप्रीत जुनेजा 08, नमन ओझा 09, जोहान बोबा 07 आणि इरफान पठान 04 हे अवघ्या 53 धावांची भर घालत परतल्याने 15.2 षटकांत दिल्लीच अवस्था सहा बाद 97 अशी झाली. एक टोक संभाळून खेळणार्‍या माहेलाने आपले अर्धशतक पूर्ण केले, परंतु दुसर्‍या टोकावर त्याला अपेक्षित साथ मिळू शकली नाही. आंद्रे रसेल 04 धावा काढून बाद झाला. दिल्लीच्या 125 धावा असताना माहेलाही 52 चेंडूत 66 धावा काढून परतला, तर तो बाद झाल्यानंतर तीनच धावांनी दिल्लीचा डाव संपुष्टात आला. डावातील शेवटच्या षटकात आशीष नेहरा सु‍नील नारायणच्या चेंडूवर खाते उघडण्यापूर्वीच परतला, तर डावाच्या शेवटच्या चेंडूवर शाहबाज नदीम 04 धावांवर धावबाद झाला. उमेश यादव शून्यावर नाबाद राहिला.

विजयासाठी 129 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणार्‍या कोलकात्याला डावाच्या दुसर्‍याच षटकात धक्का बसला आणि नेहराने मनविंदर बिसलास 04 धावांवर बाद केले. कर्णधार गौतम गंभीर आणि अनुभवी जॅक्स कॅलिसने दुसर्‍या गड्यासाठी 46 धावा जोडल्यानंतर शाहबाज नदीमने कॅलिसला 23 धावांवर बाद केले. गंभीर आणि मनोज तिवारीने 41 धावा जोडून संघाचा विजय आटोक्यात आणल्यानंतर बोथाने गंभीरला 42 धावांवर, तर सहा धावांची भर पडल्यानंतर नदीमने तिवारीला 23 धावांवर बाद करून कोलकात्याची स्थिती चार बाद 99 अशी केली. गंभीर यांनी उभ्या केलेल्या मजबूत पायावर मनोज तिवारी (२३), ईयॉन मॉर्गन (१४*) आणि युसूफ पठाण (१८*) यांनी विजयी मिळवून दिला.